महाराष्ट्र मुंबई

“…म्हणून राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला”

File Photo

मुंबई | राज्यपालांना उत्तराखंडमधील मसुरीला आयएएस अकॅडमीच्या सांगता समारोपाला जायचं होतं. आठवड्यापूर्वी राज्यपाल कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यलयाला परवानगी मागितली होती. मात्र मुख्यमंत्री कार्यलयाकडून परवानगी मिळाली नाही.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान प्रवासाला परवानगी नाकारल्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून भाजप नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. आता यावर मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.

राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही, असं मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केलंय.

राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींच्या बाबतीत राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणं अपेक्षित होतं, ते झालं नसल्याने या प्रकाराबाबत शासनाने देखील गंभीर दखल घेतली असून राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, असं मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

अन् भर संसदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या…’निर्मलाताई, माझ्या दादाकडून अर्थखातं शिका’

आता जनताच या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल- आशिष शेलार

राज्यपाल आणि ठाकरे सरकारच्या वादात आठवलेंची उडी, म्हणाले…

पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी केली ‘ही’ मोठी मागणी!

राज्यपालांवर ओढवली नामुष्की; फडणवीस म्हणातात, “इगोवालं सरकार!”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या