सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! अर्ज करण्यासाठी ‘या’ लिंकवर क्लिक करा

Job Update l जर तुम्ही सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप चांगली आहे. कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी संघटना (CMPFO) ने भरती अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार CMPFO मध्ये 136 पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या तारखेपर्यंत अर्ज करता येणार :

CMPFO ने जारी केलेल्या जाहिरातीनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवार starrating.coal.gov.in/cmffo या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनो सर्वात महत्वाची बाब म्हणे अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 6 सप्टेंबर 2024 निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवार या तारखेपर्यंत ऑनलाईन स्वरूपात अर्ज करू शकतात.

CMPFO ने 136 पदांच्या भरती प्रक्रियेत कनिष्ठ हिंदी अनुवादकासाठी 10 पदे निश्चित करण्यात आली आहेत. तर 126 पदे सामाजिक सुरक्षा सहाय्यकासाठी आहेत. भरती मोहिमेसाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. मात्र अर्जदाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Job Update l वयोमर्यादा काय आहे? :

अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेअंतर्गत कनिष्ठ हिंदी अनुवादकासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे. तर सामाजिक सुरक्षा सहाय्यकासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. कमाल वयोमर्यादेत SC-ST श्रेणीतील उमेदवारांना 5 वर्षांनी, OBC 3 वर्षांनी आणि PWBD 10 वर्षांनी सूट दिली जाणार आहे.

News Title : CMPFO Job Updates

महत्त्वाच्या बातम्या- 

तुम्हीही कर्ज घेतले आहे का? तर CIBIL बाबतचा नवीन नियम नक्की जाणून घ्या

मोठी बातमी! अजित पवारांच्या जीवाला धोका? कार्यकर्ते टेन्शनमध्ये

“दोन-चार कपडे काढले असते तर..”; विनेश फोगाटबद्दल भाजप नेत्याची वादग्रस्त पोस्ट

महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा

या राशीवर महादेवाची कृपा राहणार!