Top News आरोग्य कोरोना

गुड न्यूज! भारतात विकसित लसींचा प्राण्यांवरील प्रयोग यशस्वी, मानवी चाचणीला परवानगी

नवी दिल्ली | रशियामध्ये लससंशोधनाचे सुरुवातीचे टप्पे यशस्वी झाले आहेत. तसेच चीन, अमेरिका यांनीदेखील संभाव्य लसींवरील संशोधन जलदगतीने करण्याचं ठरवलं आहे. भारतातही संभाव्य लसींचा प्राण्यांवरील प्रयोग यशस्वी झाला आहे.

कोरोनावर दोन लसी विकसित करण्यात आल्या असून प्राण्यांवरील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मानवी चाचणीला देखील परवानगी दिली आहे, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली आहे.

उंदीर आणि ससा यांच्यावर या लसींचा प्रयोग करण्यात आला. दोन्ही स्वदेशी लसींची टॉक्सिसिटी स्टडीज यशस्वी झाली आहे. दोन्ही मानवी लसींच्या चाचणीसाठी तयारी करण्यात आली असून या दोन्ही लसींसाठी एक – एक हजार नागरिकांचा क्लिनिकल स्टडीही करण्यात येत आहे अशी माहिती भार्गव यांनी दिली आहे.

‘आयसीएमआर’ने 15 ऑगस्टपर्यंत लसनिर्मितीची अपेक्षा व्यक्त करणारे पत्र मानवी चाचणी घेणाऱ्या रुग्णालयांना लिहिल्यानंतर वाद निर्माण झाला होता. मात्र भारतातील यशस्वी लसनिर्मितीसाठी किती काळ लागेल हे मात्र भार्गव यांनी स्पष्ट केलं नाही.

महत्वाच्या बातम्या-

औरंगाबादच्या तरुणाच्या वेबपोर्टलची किमया; कोरोना काळात थेट गुगलनं केली आर्थिक मदत

‘भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झालीयेत’; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

मुलीचं प्रेम बापाला नव्हतं मान्य; पुण्यात प्रियकराची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या

‘दोन दिवसात उत्तर द्या अन्यथा…’, सचिन पायलट यांना काँग्रेसची नोटीस

…म्हणून 25 वर्षीय महिलेनं महिला पोलिसाचा हात पिरगळला; महिलेला अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या