बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांचा ॲानलाईन संवाद रद्द, संपूर्ण लॅाकडाऊनसंदर्भात नवी माहिती आली समोर

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. वाढत्या कोरोनामुळे महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन संदर्भात सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्रात संपूर्ण कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात निर्णय झाला असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह द्वारे लॉकडाऊन संदर्भातील निर्णय आज जाहीर करतील असं काही मंत्र्यांकडूनही सांगण्यात आलं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये महापालिका रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे जनतेशी संवाद रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांऐवजी आता राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या मार्फत महाराष्ट्रातील लॉकडाऊन संदर्भातील अध्यादेश जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे मुख्य सचिव अध्यादेश काढून महाराष्ट्रातील लॉकडाऊन संदर्भातील निर्णय जाहीर करतील अशी माहिती समोर आल्यानंतर आता मुख्य सचिव हा निर्णय कधी जाहीर करणार आणि महाराष्ट्रात नवीन नियम नेमके काय असणार याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात बोलण्यासाठी पुढे येणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

“दिल्ली मरतेय, थोडीतरी लाज असेल तर राजीनामा द्या”

“कुणी कितीही आपटा संजय काकडे सापडणार नाही”

“कोरोनाची दुसरी लाट आणि त्या लाटेचं व्यवस्थापन ही मोदी निर्मित ट्रॅजेडी”

“नाशिक महापालिका आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”

“आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण…”, नाशिकमध्ये घडलेल्या घटनेवरून राज ठाकरे आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More