बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कारणामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दाैरा रद्द; विशेष विमानाने मातोश्रीकडे रवाना

सातारा | नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या दोन दिवसांपासुन दाैऱ्यावर आहेत. तसेच कोकणचा दौरा संपवुन मुख्यमंत्र्याचा आज सातारा जिल्ह्यात दौरा आयोजित करण्यात आला होता. तसेच सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आज होणारा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात सततच्या धुवाधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याच पार्श्वभुमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सातारा जिल्ह्यातील कोयनानगर परिसरात नुकसानीची पाहणी करण्यासाठी जाणार होते. परंतु, साताऱ्या च्या कोयनानगर परिसरात कमी दृश्यमानतेअभावी हेलिकाॅप्टरला उतरण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

वातावरण खराब झाल्याने मुख्यमंत्र्याचं हेलिकाॅप्टर पुण्याच्या दिशेने वळविण्यात आलं. तसेच पुणे विमानतळावर वातावरण स्थिर होण्याची वाट पाहण्यात येत होती. पण वातावरणात बदल न झाल्याने आजचा मुख्यमंत्र्यांचा सातारा जिल्हा दौरा रद्द करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच विशेष विमानाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईला मातोश्रीकडे रवाना झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांकडुन माहिती घेऊन तात्काळ स्वरूपात नागरिकांना योग्य ती मदत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. सध्या सातारा जिल्ह्यातील अनेक भागात पाणी साचलेलं आहे. तसेच वातावरण आणखी अनुकुल होण्यास काही वेळ जाणार आहे. आज मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला असेल तरीही नागरिकांना मदत मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या

“दिवसभर सायकल चालवून भाजपसाठी काम केलं, तेव्हा…”

सिंहगडच्या पायथ्याशी हॉटेलमध्ये डान्स पार्टी; पोलिसांनी 11 जणांना शिकवला धडा

ट्रॅक्टर घेऊन राहुल गांधींची संसदेत एंट्री; कृषी कायद्याविरोधात काँग्रेस आक्रमक

…ती महिला माझ्या मुलीसारखी होती- भास्कर जाधव

“भास्कर जाधवांचा अरेरावीचा प्रकार मालकाला खूश करण्यासाठी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More