बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागितली केरळ सरकारकडे ‘ही’ महत्त्वाची मदत

मुंबई |  महाराष्ट्राचा कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतो आहे. मुंबई-पुणे-नाशिक-नागपूर-औरंगाबादसह ग्रामीण भागात देखील कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची कोरोनाबाधितांची संख्या आता 50 हजार पार गेली आहे. अशातच मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनी केरळ सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

कोरोनाशी यशस्वी लढा दिलेल्या डॉक्टर आणि नर्सेसना राज्यात पाठविण्याची विनंती राज्य सरकारतर्फे पाठविलेल्या पत्रात केरळ सरकारकडे करण्यात आली आहे. केरळमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यात सरकार आणि यंत्रणेला आलेल्या यशानंतर आता तोच प्रयोग महाराष्ट्रातही व्हावा, अशा सरकारचा मानस आहे.

केरळच्या नर्सेस आणि डॉक्टर्सने प्राणपणाने लढत केरळला कोरोनापासून अगदी काही दिवसांत वाचवलं. त्यांचा हाच अनुभव महाराष्ट्र राज्याच्या देखील कामी यावा, असा मानस ठेऊन राज्य सरकारने केरळ शासनाला पत्र लिहिलं आहे.

दुसरीकडे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केरळच्या आरोग्यमंत्री के. शैलजा यांच्याशी व्ही.सी. द्वारे चर्चा केली होती. यावेळी कोरोनाशी लढताना केरळने कोणत्या उपाययोजना केल्या?, टाळेबंदीसंबंधी नियम आणि अटी काय होत्या?, केरळची क्वारंन्टाईन प्रोसेस काय होती, यासह आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.

ट्रेंडिंग बातम्या-

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

आपल्या घामाने महाराष्ट्र घडवणाऱ्या मजुरांचा ठाकरे सरकार छळ करतंय- योगी आदित्यनाथ

महत्वाच्या बातम्या-

कामगारांच्या मदतीला अभिनेत्री माधुरी दिक्षीत धावली

लग्नाचं आमिष दाखवून ठेवलेले लैंगिक संबंध बलात्कार नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सूचना केल्यावर राजकारण समजत असाल तर तुम्ही गैरसमजात रहा; फडणवीसांचं उद्धव यांना प्रत्युत्तर

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More