पेट्रोल-डिझेल महाग म्हणून सीएनजी गाड्या घेतल्या, अशा लोकांना झटका देणारी बातमी
नागपूर | पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) गगनाला भिडल्याने अनेकांनी सीएनजी गाड्यांना पसंती दर्शवली. मात्र, पेट्रोल-डिझेल महाग म्हणून सीएनजी (CNG) गाडी घेतलेल्यांना मोठा झटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलपेक्षा सीएनजी महाग झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.
नागपूरात (Nagpur) पेट्रोल-डिझेल पेक्षा सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. नागपूरात सीएनजीचे दर प्रतिकिलो 120 रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत. नागपूरमध्ये सीएनजी पाईपलाईन नसल्याने सरकारी सबसिडी मिळत नाहीये आणि याचा थेट परिणाम सीएनजीच्या किमतीवर झाला आहे.
गुजरातमधून एलएनजी आणून नागपूरमध्ये सीएनजीत रूपांतर करण्याचा खर्च जास्त होत आहे. त्यामुळे देशात सर्वात महाग सीएनजी सध्या नागपूरमध्ये मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी 100 रूपये प्रतिकिलोने विकल्या जाणाऱ्या सीएनजीच्या दरात तब्बल 20 रूपयांनी वाढ झाली आहे.
दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीमुळे एलएनजीचे दर आधीच वाढले आहेत. त्यात रस्ते मार्गाने एलएनजी आणून त्याचं रूपांतर सीएनजीमध्ये करण्याचा खर्च भरपूर आहे. परिणामी नागपूरमध्ये सीएनजीच्या दराने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे नवीन सीएनजी गाड्या खरेदी केलेल्या अनेकांना आपण चूक केल्याचं वाटत आहे.
थोडक्यात बातम्या-
उत्तराखंडात आप ठरणार किंग मेकर, वाचा एक्झिट पोलचा अंदाज
‘…तरच युद्ध थांबेल’; रशियाच्या या नव्या चार अटींनी युक्रेनचं टेंशन वाढलं
“मी म्हातारा होईपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री होत नाहीत”
पुढील 3 दिवस महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी
‘त्या’ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का?, नाना पटोलेंचा सरकारला सवाल
Comments are closed.