पुणे | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याने नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असताना पुणेकरांना मात्र मोठा झटका बसला आहे.
पुण्यात (Pune) सीएनजीच्या (CNG) दरात आणखी एकदा वाढ झाली आहे. पुण्यात दिड महिन्यात सीएनजीचे दर तिसऱ्यांदा महागल्याने पुणेकरांना धक्का बसला आहे. पुण्यात आता सीएनजीच्या दरात 2 रूपये 40 पैशांची वाढ करण्यात आली आहे.
सीएनजीच्या नवे दर आजपासून लागू करण्यात आले असून आता पुणेकरांना प्रतिकिलो सीएनजीसाठी 77.20 रूपये मोजावे लागणार आहेत. सर्वात आधी सीएनजीच्या दरात तब्बल पाच रूपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सीएनजी 2.20 रूपयांनी महागल्यानंतर आता तिसऱ्यांदा सीएनजीच्या दरात 2.40 रूपयांची वाढ झाली आहे.
दरम्यान, गेल्या 24 दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. पण पुण्यात मात्र तिसऱ्यांदा सीएनजी महागलं आहे. सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असताना ग्राहकांना मात्र मोठा फटका बसत आहे.
थोडक्यात बातम्या-
रशिया-युक्रेन युद्धाचा तळीरामांना असाही फटका, महत्त्वाची माहिती समोर
“राणे, सोमय्या, कंगना रनौतच्या पंक्तीत आता राणाही बसतील”
मोठी बातमी! हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांनी उचललं ‘हे’ पाऊल
काहिली वाढणार काळजी घ्या! IMD कडून ‘या’ पाच राज्यांना अलर्ट जारी
बच्चू कडूंना मोठा दिलासा; ‘या’ प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
Comments are closed.