बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल-डिझेलपाठोपाठ CNG च्या दरातही वाढ; वाचा आजचे दर

नवी दिल्ली | देशात महागाई गगनाला भिडली असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आधीच कात्री लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंधन दरवाढ होत असताना सीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दरात 14 दिवसात 12 वेळेस वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असताना आता सीएनजीच्या (CNG) दरात देखील किलोमागे 80 पैशांनी वाढ झाली आहे. हे नवे दर आज सकाळी 6 वाजल्यापासून लागू करण्यात आले आहेत.

सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानंतर राजधानी दिल्लीत (Delhi) प्रतिकिलो सीएनजीसाठी 61.61 रूपये मोजावे लागणार आहेत. तर सोमवारी प्रतिलीटर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतीतही 40 पैशांनी वाढ झाली आहे.

दरम्यान, एक आठवड्यात सीएनजीच्या दरात तीन वेळेस वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात या आठवड्यात किलोमागे आतापर्यंत 2.40 रूपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल पाठोपाठ सीएनजीच्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे.

थोडक्यात बातम्या-

राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन जाहीर

‘अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा’; सुजात आंबेडकरांचं खुलं आव्हान

‘देवेंद्र भाऊ तुम्ही अ‌ॅडजस्ट करून घेतलं तर…’, अशोक चव्हाणांचा फडणवीसांना टोला

S.T Strike| एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचं पुन्हा आवाहन, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More