बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महत्त्वाची बातमी! ‘या’ कारणामुळे आजपासून काही दिवस CNG राहणार बंद

पुणे | पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुढील काही दिवस पुणे शहरातील सीएनजी पंप बंद (CNG Stations in pune will be cloesed) राहणार आहेत. त्यामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीवर पुढील काही दिवस याचा मोठा परिणाम होणार आहे.

6 जानेवारी ते 11 जानेवारी पुण्यातील सीएनजी पंप बंद राहणार आहेत. पुणे शहरात एमजीएनलच्या मुख्य सप्लाय लाईनच्या दुरूस्ती सुरु आहेत. यासोबत इतरही दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे पुढील पाच दिवस सीएनजी पंप बंद राहणार आहेेत.

पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात वाहने सीएनजीवरील आहेत. त्यामुळे पुणेकरांची पुढील पाच दिवस गैरसोय होणार आहे. त्याचबरोबर महापालिकेने सीएनजीवरील पीएमपीएल आणलेल्या आहेत. त्यामुळे पीएमपीेएल वाहतुकीवरही याचा परिणाम होणार आहे.

दरम्यान, एमजीएनएल आणि इतर दुरुस्तीची कामे झाल्यास पुन्हा सीएनजी पंप सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

थोडक्यात बातम्या-

‘त्या लोकांना पंतप्रधानांच्या गाडीपर्यंत कोणी पोहचवलं?’, स्मृती इराणींचे काँग्रेसवर गंभीर आरोप

“… मी जिवंत पोहचू शकलो, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा”

धक्कादायक! संजय राऊतांच्या घरी कोरोनाचा शिरकाव, चार जणांना कोरोनाची लागण

पुढील चार दिवस जोरदार पाऊस; ‘या’ भागात अलर्ट जारी

मोठी बातमी! राज्यातील सर्व महाविद्यालय ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More