नवी दिल्ली | बीसीसीआयकडून नुकतंच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यामध्ये टीमचा अष्टपैलू खेळाडू रोहित शर्माचा समावेश केला गेला नाहीये. यासंदर्भात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले, पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याशिवाय रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ नये.
शास्त्री पुढे म्हणाले, मेडिकल टीम, रिपोर्ट आणि फिजियोथेरेपिस्ट यांचा सल्ला घेऊन निवड समितीने रोहित संदर्भात निर्णय घेतला असेल. रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड का झाली नाही याबाबत मला काहीही माहिती नाहीये. पण रोहित़ने पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ नये.
दुखापत होणं हे एखाद्या खेळाडूसाठी फार निराशाजनक गोष्ट असते. तो खेळाडू त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत असतो. अडचणींचा सामना करून त्याला खेळायचं असतं, असंही शास्त्री यांनी सांगितलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
अन् भर सभेत ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, काँग्रेसला मत द्या…
“मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवारांना धडा शिकवा, त्यांची सरकारमधून हकालपट्टी करा”
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अनिल देशमुख, नवनीत राणांसह 17 जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता