बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वसामान्यांचं स्वप्न महागलं! कोळसा टंचाईमुळे वाढले बांधकाम साहित्याचे दर

 मुंबई | गेल्या काही दिवसांपासून देशात कोळसा टंचाईचं संकट निर्माण झालं आहे. वीजपुरवठ्याबाबतीत देश मोठ्या संकटात जाऊ शकतो, असं वक्तव्य दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी केलं होतं. त्यातच आता कोळशाच्या  कमरतेमुळे अनेक उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे. हे उद्योग पुर्ण क्षमतेने चालवता येत नसल्याने आता बांधकाम साहित्याचे दर वाढताना दिसत आहेत.

कमी उत्पादन आणि मागणीत वाढ झाल्यामुळे बाजारपेठेला अनुकूल पुरवठा करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. यामुळे सिमेंट, स्टील या प्रमुख घटकांसोबतच बांधकामाच्या अन्य साहित्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अनेक दिवसांपासून बांधकाम क्षेत्राला नविन समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

सिमेंट आणि स्टीलच्या साठेबाजीमुळे बांधकाम क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे. आता संपुर्ण देशात कोळशाच्या कमतरतेमुळे बांधकाम साहित्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. कोळसा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने सिमेंट उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. कारण कोसळशापासून निर्माण होणाऱ्या राखेमुळे सिमेंट फ्लाय अॅश तयार होते.

दरम्यान, कोळसा टंचाईचा वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांवर परिणाम झाला आहे. अनेक उद्योगांची वीज कपात केल्यामुळे उत्पादनाला मोठा फटका बसला आहे.यासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्यस्तरावर हालचाली सुरू आहेत.

थोडक्यात बातम्या- 

सोन्याच्या दरात 580 रुपयांची घट तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ, वाचा ताजे दर

IRCTCच्या स्टॉकमध्ये एवढी मोठी घसरण का? एक्सपर्ट म्हणतात…

मोठी बातमी! प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये अटक; कलम 144 लागू

“मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता, मेलो तरी त्यांना सोडणार नाही”

‘शशिकांत शिंदेंना भाजप 100 कोटींची ऑफर देईल असं मला वाटत नाही’; प्रविण दरेकरांचं शिंदेंना प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More