मुंबईकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी; लवकरच ‘हा’ रोड खुला होणार

Mumbai News

Mumbai News l मुंबईकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. मुंबई किनारी रस्ता (Coastal Road) प्रकल्पांतर्गत मरीन ड्राईव्ह (Marine Drive) ते वरळी-वांद्रे सागरी सेतूला (Bandra-Worli Sea Link) जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले असून येत्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन होणार आहे.

सोमवारपासून हा संपूर्ण कोस्टल रोड (Coastal Road) मुंबईकरांच्या सेवेसाठी खुला होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार असून मरीन ड्राईव्ह (Marine Drive) ते वांद्रे (Bandra) हा प्रवास अवघ्या नऊ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.

सध्या या मार्गावरून सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंतच प्रवास करता येईल. मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते थेट दहिसरपर्यंत (Dahisar) वेगाने प्रवास करण्यासाठी हा किनारी रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या रस्त्यामुळे मुंबईकरांच्या वेळेत आणि इंधनात मोठी बचत होणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये :

हा कोस्टल रोड (Coastal Road) प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाची पहिली मार्गिका मागील वर्षी १२ मार्च रोजी खुली करण्यात आली होती. आता या मार्गाचा वांद्र्यापर्यंतचा (Bandra) टप्पा पूर्ण झाला आहे.

दक्षिण मुंबईकडून (South Mumbai) उत्तर मुंबईकडे (North Mumbai) जाणाऱ्या वाहतुकीसाठी वरळी-वांद्रे सेतूला (Bandra-Worli Sea Link) जोडणारे दोन पूल बांधण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हे पूल बांधण्यासाठी प्रथमच बो आर्च स्ट्रिंग गर्डर (Bow Arch String Girder) वापरण्यात आले आहेत. या पुलांमुळे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाचे वरळीकडील (Worli) दोन्ही टप्पे आता थेट जोडले गेले आहेत.

Mumbai News  l खुले होणारे टप्पे :

रविवारी या कोस्टल मार्गाच्या (Coastal Road) अंतिम टप्प्यासोबत वरळी (Worli), प्रभादेवी (Prabhadevi), लोअर परळ (Lower Parel), लोटस जंक्शन (Lotus Junction) आदी भागातील तीन आंतरमार्गिका (Interchanges) देखील सुरू करण्यात येणार आहेत.

सध्या अमरसन्स (Amarsons), हाजी अली (Haji Ali) व वरळी (Worli) हे तीन आंतरमार्गिका (Interchanges) खुले आहेत. या प्रकल्पाचे आतापर्यंत ९४ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून १०.५८ किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी १११ हेक्टर जमिनीवर भराव टाकण्यात आला आहे.

News Title : Coastal Road to Open Soon, Travel from Marine Drive to Bandra in Just 9 Minutes

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .