बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोब्रा कमांडो नक्षलवाद्यांच्या ताब्यात; सहिसलामत सोडण्यासाठी घातली ‘ही’ अट

रायपूर | छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये 25 लाखांचा इनाम असलेल्या नक्षलवाद्याला पकडण्यास गेलेल्या 200 सुरक्षा जवानांच्या एका तुकडीला घेरून नक्षलवाद्यांनी जोरदार हल्ला केला. यामध्ये 24 जवान शहीद झाले असून एक जवान बेपत्ता झाला आहे. हा बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचा फोन नक्षलवाद्यांनी एका पत्रकाराला करून अट ठेवल्याने खळबळ उडाली आहे.

नक्षलवाद्यांनी जवानाला कोणतेही नुकसान करणार नसल्याचे सांगितले आहे. कुख्यात नक्षलवादी हिडमा याला पकडण्यासाठी जवान रविवारी त्याच्या परिसरात गेले होते. 200 जवानांची मोठी टीम वेगवेगळ्या भागात हिडमाला पकडण्यासाठी जंगलात घुसत होती. मात्र, नक्षलवाद्यांनी या जवानांना कोणत्याही प्रकारे न रोखता आतमध्ये जाऊ दिले आणि घात केला.

बेपत्ता असलेला जवानाचं नाव राजेश्वर सिंह मनहास असून तो जम्मू-काश्मीरचा आहे. हा जवान अत्यंत घातक अशा कोब्रा बटालियनचा आहे. नक्षलवाद्यांनी पत्रकाराला फोन करून याची माहिती दिली. तसेच ते या जवानाला सोडण्यास तयार आहेत. परंतू राजेश्वर सिंह यांना इथून सोडल्यावर सुरक्षा दलामधून निवृत्ती घ्यावी आणि नोकरी सोडून दुसरे कोणतेही काम करावे, अशी अट त्यांनी घातली आहे.

दरम्यान, राजेश्वर सिंहांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. कंट्रोल रुमकडून ते बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे तर न्यूज चॅनलवर ते नक्षल्यांच्या ताब्यात असल्याचे दाखविले जात आहे. राजेश्वर यांच्या जम्मूतील घरी त्याचे नातेवाईक जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राजेश्वर यांच्या पत्नीने छत्तीसगड सरकारला नक्षलवाद्यांची जी काही मागणी आहे ती पूर्ण करून पतीला सोडविण्याची विनंती केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनावर मात करण्यासाठी शरद पवारांनी जनतेला केलं ‘हे’ आवाहन

योगी आदित्यनाथांनी शिवी दिल्याचा आरोप; ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका शब्दानेही बोलत का नाहीत?”

“अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचं काम सुरु”

“संजय राऊत यांची अवस्था केविलवाणी, सांगताही येत नाही अन्…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More