बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

त्वचेच्या सर्व समस्यांसाठी नारळ तेल आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे!

मुंबई | तरुण वयातील मुलींना तसेच अनेक महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे त्वचेच्या समस्या असतात. अनेक वेळा औषधं तर वेगवेगळ्या ट्रिटमेंट घेऊन देखील या समस्यांवर मात करणं कठीण जातं. अशातच नारळ तेल त्वचेच्या समस्यांसाठी प्रचंड फायदेशीर ठरते. तसेच केसांसाठी देखील नारळ तेल सारखे फायदेशीर उपाय नसल्याचं सर्वांना माहित आहे.

गेल्या कित्येक शतकांपासून त्वचेसाठी सर्वात फायदेशीर उपाय म्हणून नारळ तेल वापरण्यात येतं आहे. यादरम्यान, कोरडी त्वचा असल्यास रोज रात्री नारळ तेल लावून झोपावे. याने चेहऱ्यावर चमक येते. अर्थातच नारळ तेल माॅईश्चरायझरचे काम करते. तसेच मुलींच्याच नाही तर महिलांच्या चेहऱ्यावरही पिंपल्स असतात. अशांनी बेसनमध्ये नारळ तेल घालून उपाय करावा.

चेहऱ्यावर असणाऱ्या मुरुमाची समस्या देखील नारळ तेलाने बरी केली जाते. चेहऱ्यावर असलेल्या मुरामावर नारळ तेल लावल्यास मुरम कमी होण्यास मदत होऊन वापर योग्य केल्यास मुरम नाहीसे होतात.

दरम्यान, त्वचेसाठी नारळ तेल जितकं फायदेशीर आहे तितकेच केसांसाठी देखील आहे. केस गळतीवर एॅवोकॅडोमध्ये मॅश केलेली केळी घालून त्यामध्ये नारळ तेल मिळून केसांवर पेस्ट लावावी. हा केस गळतीच्या समस्येवर रामबाण उपाय आहे.

थोडक्यात बातम्या-

ट्रॅक्टर घेऊन राहुल गांधींची संसदेत एंट्री; कृषी कायद्याविरोधात काँग्रेस आक्रमक

…ती महिला माझ्या मुलीसारखी होती- भास्कर जाधव

“भास्कर जाधवांचा अरेरावीचा प्रकार मालकाला खूश करण्यासाठी”

मोठी बातमी! कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केली राजीनाम्याची घोषणा

बॉसने दरडावल्याने तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More