Coconut Water l उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरते. चवीला गोड असणाऱ्या नारळ पाण्यात अनेक पोषक तत्वे असतात, जी आरोग्यासाठी लाभदायी असतात. नारळ पाण्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, आयर्न, कॅल्शिअम, कॉपर, फॉस्फोरस, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखे पोषक घटक आढळतात. मात्र, काही विशिष्ट परिस्थितीत नारळ पाण्याचे सेवन करणे नुकसानकारक ठरू शकते.
या लोकांनी नारळ पाणी पिऊ नये:
किडनीची समस्या: ज्या लोकांना किडनीशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी नारळ पाणी पिणे टाळावे. नारळ पाण्यात पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे किडनीला ते फिल्टर करणे कठीण होऊ शकते.
उच्च रक्त शर्करा (High Blood Sugar): मधुमेह (Diabetes) असलेल्या व्यक्तींनी नारळ पाणी पिऊ नये. नारळ पाण्याचे ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) जास्त असते आणि त्यात कार्बोहायड्रेट्सदेखील (Carbohydrates) भरपूर असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
अॅलर्जी: काही लोकांना नारळ पाणी प्यायल्यानंतर अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. त्वचेवर खाज सुटणे, पुरळ उठणे किंवा सूज येणे यांसारखी लक्षणे आढळल्यास नारळ पाणी पिणे टाळावे.
उच्च रक्तदाब (High Blood Pressure): उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी नारळ पाणी पिणे टाळावे, कारण नारळ पाण्यातील पोटॅशिअम उच्च रक्तदाबाच्या औषधांसोबत मिसळून शरीराला हानी पोहोचवू शकते.
सर्दी-पडसे: नारळ पाणी थंड असते, त्यामुळे सर्दी-पडसे झाले असल्यास ते पिणे टाळावे.