अटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार

नवी दिल्ली | भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच चित्र असलेलं नाणं लवकरच चलनात येण्याची शक्यता आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95 व्या जन्मवर्षानिमित्त हा निर्णय घेतला जाणार आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी झाला होता. 25 डिसेंबर या दिवसाची विशेष आठवण म्हणून सरकार 100 रुपयांचं नाणं चलनात आणण्याचा निर्णय घेऊ शकते. 

100 रुपयांच्या नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभ तर दुसऱ्या बाजूला अटल बिहारी वाजपेयींच देवनागरी आणि इंग्रजीतील नाव, चित्र आणि चित्राच्या खाली 1924-2018 असा उल्लेख असणार आहे.

दरम्यान, अटल बिहारी वाजपेयींच निधन 16 ऑगस्ट 2018 रोजी झालं होतं.

महत्वाच्या बातम्या 

-“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”

-“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”

-‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न!

-राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण

-RAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया