बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात कडाक्याची थंडी! येत्या 2 दिवसात तापमानाचा पारा आणखी घसरणार

मुंबई | गेल्या काही दिवसात राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातलं होतं. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. हिवाळा सुरू असताना अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाने (Heavy rain) हजेरी लावली. गेल्या तीन दिवसांमध्ये राज्यातील वातावरण ढगाळ आहे. हवामान विभागाकडून आता कडाक्याच्या थंडीचा इशारा देण्यात आला आहे. (Warning of severe cold)

नोव्हेंबर महिन्यात राज्यात अपेक्षित थंडी जाणवली नाही. परंतु, येत्या दोन दिवसांमध्ये राज्यात कडाक्याची थंडी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. सद्यस्थितीत हिमालयात पश्चिमी चक्रवात परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच महाराष्ट्राच्या दिशेने थंडगार वारे उत्तरेकडून वाहण्यास सुरूवात झाली आहे. थंड वारे वाहत असल्याने दोन दिवसात कमालीची थंडी वाढणार आहे.

9 डिसेंबरपासून देशासह महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पसरण्याची शक्यता आहे. तसेच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हवेतील गारवा तीव्र होणार आहे.  हवामान कोरडे झाल्याने दिवसाचं कमाल तापमान सामान्य स्थितीत येऊन रात्रीच्या किमान तापमानत घट होणार आहे. तसेच  काश्मीर (Kashmir), हिमाचल (Himachal), लडाख (Ladakh), उत्तराखंड (Uttarakhand), पंजाब (Punjab), हरियाणा (Haryana), चंदीगड (Chandigarh) या ठिकाणी मोठ्या स्परूपाचा पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता असल्याने राज्यात गुलाबी थंडी येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यातील अवकाळी पावसानंतर 5 डिसेंबरपासून राज्यात सुर्यदर्शन होत आहे.राज्यातील आस्मानी संकटाची भीती संपली. त्यानंतर आता राज्यात पुढील आठ दिवसांनंतर पारा घसरणार आहे. पुढील आठवड्यात कडाक्याची थंडी पडणार आहे. पहाटे धुके, धुई, धुराळी येणार असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

आशिष शेलारांना ‘ते’ वक्तव्य भोवणार; किशोरी पेडणेकरांनी लिहिलं थेट गृहमंत्र्यांना पत्र

“आमचं सरकार येणार हाय, तवा तुम्हाला सुट्टी नाय”

“महाविकास आघाडी म्हणजे Mini UPAचा प्रयोग”

योगी सरकारचा रंगारंग कार्यक्रम! मोदींच्या दौऱ्याआधी एका रात्रीत मस्जिदीचा रंग बदलला

Covishield की Covaxin? ओमिक्राॅनवर कोणती लस प्रभावी?, तज्ज्ञ म्हणतात…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More