बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘विद्यार्थ्यांना वास्तवाचं भान असलं पाहिजे’; कलेक्टर कौस्तुभ दिवेगावकर यांची पोस्ट व्हायरल

मुंबई | MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी एक फेसबुक पोस्ट लिहित MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे. मी माझा UPSC चा निकाल लागल्यापासून एक तत्व पाळत आलोय. शक्यतो भाषणबाजी करायची नाही. अभ्यासाबद्दल बोलायचे. विद्यार्थ्यांना वास्तवाचे भान असले पाहिजे. IAS होणे एक मोठी संधी आहे. पण ती संधी सर्वोच्च नाही, असं कौस्तुभ दिवेगावकर यांनी म्हटलंय.

आज एका शासकीय पदावर कार्यरत असताना हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की खासगी क्षेत्रापेक्षा शासकीय सेवेत पगार कमी आहेत. जबाबदारी अधिक आहे. व्यवस्था एक दोन लोकांनी बनत नाही. ती असंख्य लोक, विचार, नियम, संस्था यातून आकाराला येते. तिला चेहरा म्हटलं तर असतो, म्हटलं तर नसतो. यामुळे आपण ज्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी येऊ पाहतो त्या सोबत काही मर्यादाही आपल्याला समजून घ्याव्या लागतील. पगारात भागवणे तर आहेच, त्याशिवाय अनेक प्रकारची आव्हाने, टीका टिपण्या यांना तोंड देणं शिकत राहावं लागतं. सातत्य आणि संयमाची परीक्षा कोणालाही चुकलेली नाही, असं कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितलं.

यशाच्या व्याख्या बदलाव्या लागतील. चांगला माणूस म्हणून जगणं, कष्ट करणं आणि कष्टाचा एकेक रुपया हे सामाजिक यश मानणारा समाज आपण निर्माण करणार आहोत का? Survival of the fittest कडून सर्वोदयाकडे जाण्याचा मार्ग सोपा नाही. पण समाज म्हणून आपल्याला कधी ना कधी तो स्वीकारावा लागेल, असं कौस्तुभ दिवेगावकर यांनी म्हटलंय.

शासकीय नोकरीच्या पलीकडेही एक जग असतं. आपल्या मागे आपलं घर असतं. प्रत्येकाचा संघर्ष तितकाच महत्वाचा असतो. पण तो आपल्या जवळच्या लोकांपेक्षा महत्वाचा खरंच नाही. निराशेच्या एका क्षणी त्यांचा विचार केला पाहिजे, असं कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले.

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘ज्यांना आजवर कोरोना झाला नाही त्यांनी…’; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

‘…मग तुमची झोप का उडाली?’; राष्ट्रवादीची शिवसेनेवर खोचक टीका

भारतीय खेळाडूची ऐतिहासिक खेळी; टी-20 मध्ये ठोकलं धुवाधार द्विशतक

“हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींनी राफेल डीलवर पत्रकार परिषद घ्यावी”

“विरोधकांनी महाराष्ट्रातील उत्तम कामगिरीबद्दल ठाकरे सरकारचे आभारच मानायला हवेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More