बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाऊनमध्ये दुकान सुरू ठेवल्याने महिला जिल्हाधिकाऱ्यांची मुजोरी, पाहा व्हिडिओ

भोपाळ | गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मुजोरीचे अनेक उदाहरणं पाहायला मिळत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर शिस्त पाळून घेण्याची जबाबदारी असते पण गेल्या काही दिवसात अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करताना पाहायला मिळत आहेत. छत्तीसगडमधील सूरजपुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका तरुणाला भर चौकात कानाखाली मारल्याची घटना ताजी असतानाच आता मध्यप्रदेशातील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी एका दुकानदाराच्या कानशिलात लगावली आहे.

मध्यप्रदेश राज्याच्या शहाजापूरमधील अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजुषा विक्रांत राय यांनी लॉकडाऊन काळामध्ये दुकानदाराने आपलं दुकान सुरु ठेवल्याने त्याच्या कानशिलात लगावली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये लाॅकडाऊनकाळात फक्त अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असताना चप्पल विक्रेत्याने दुकान सुरू ठेवल्याचं अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी दुकानदार व्यक्तीला चांगलंच खडसावत त्याच्या कानाखाली मारली.

काही दिवसांपूर्वी त्रिपुरातील आगरतळामधील जिल्हाधिकार्‍यांनी ही असंच एका लग्नामध्ये घुसून काही नागरिकांना मारहाण केली होती. या सर्व घटनेनंतर राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई देखील केली आहे. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मुजोरीचं हे सत्र मात्र थांबायचं नाव घेत नाही. त्यानंतर छत्तीसगडमधील मुजोर अधिकारी आयएएस रणबीर शर्मा यांच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व त्यांच्यावरही छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

लॉकडाऊन काळामध्ये नियमांचं पालन करून घेणं हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं काम असताना आपल्या अधिकाराचा गैरवापर करताना असे मुजोर अधिकारी पाहायला मिळत आहेत. दरम्यान, अधिकाऱ्यांना कोणत्याही नागरिकाला किंवा व्यक्तीला कोणत्याही कारणास्तव मारण्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. तरी देखील काही प्रशासकीय अधिकारी नियमांची पायमल्ली करून मनमानी कारभार चालवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडिओ –

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात लहान मुलांना होतोय कोरोनाचा संसर्ग; तब्बल 166 मुलं कोरोनाबाधित

टुलकिट प्रकरणाला नवं वळण; दिल्ली पोलिसांची ट्विटर इंडियाला नोटीस

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात एका दिवसात आढळले फक्त 94 कोरोनाबाधित रुग्ण

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी

मुंबईत आमदाराच्या पत्नीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ, ‘हे’ दिलं कारण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More