बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुठलीही महाविद्यालयीन परीक्षा रद्द होणार नाही, परीक्षा होणारच- उच्च-तंत्रशिक्षण मंत्री

मुंबई | दहावीचा भूगोल विषयाचा पेपर आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतल्याने महाविद्यालयीन परीक्षाही रद्द झाल्या अशा प्रकारचे संभ्रमाचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालं आहे. यावर कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणारच, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

कुठलीही महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने घेतलेला नाही. यासाठी चार कुलगुरुंची कमिटी केलेली आहे. या कमिटीतून जी शिफारस येईल त्यानंतर यासंबंधी निर्णय घेतला जाईल, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

अगदीच ‘कोरोना’मुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तर भविष्यातील परीक्षा कशा घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाईल. मात्र सध्यातरी कुठल्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणार आहेत, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान,  कोरोना’मुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेला एसएससीच्या विद्यार्थ्यांचा दहावीचा भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात काल घोषणा केली.

ट्रेंडिंग बातम्या-

“महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान”

…अन् अजित पवारांनी घडवून आणली माय-लेकाची भेट!

महत्वाच्या बातम्या-

सोलापुरात कोरोनाचा शिरकाव; मृत्यू झालेल्या रुग्णाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

महावितरणचा ‘या’ ग्राहकांना दिलासा; बिलातील स्थिर आकार 3 महिन्यांसाठी स्थगित

देशात 24 तासात 909 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 8,356 वर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More