महाराष्ट्र मुंबई

‘या’ तारखेपासून महाविद्यालये पुन्हा सुरु होणार; उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा

मुंबई | येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहेत, अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

राज्यातील महाविद्यालय पुन्हा सुरु करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. याबाबत काही बैठका देखील पार पडल्या. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी  दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मागणीनंतर यूजीसीच्या गाईडलाईन्सनुसार येत्या 15 फेब्रुवारीपासून 50 टक्के उपस्थितीमध्ये आम्ही कॉलेज सुरू करत आहोत, असं सामंत म्हणाले.

महाविद्यालय उशिरा सुरू होणार असल्याने त्याचे परिणाम निकालावर थोड्या प्रमाणात होतील, असंही उदय सामंत यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

‘भाजपनं आधीच सुधीर मुनगंटीवारांकडं जबाबदारी दिली असती तर…”

भाजप हा बलात्काऱ्यांचा पक्ष असं चित्रा वाघच म्हणाल्या होत्या- रूपाली चाकणकर

“…तर मग देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?”

…अन् पाणी समजून त्या सरकारी अधिकाऱ्यानं प्यायलं सॅनिटायझर!

…अन्यथा 40 लाख ट्रॅक्टर रस्त्यावर उतरवणार; शेतकरी नेत्याचा मोदींना इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या