बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रात्री झोपताना ही गोष्ट करत असाल तर आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम, वेळीच व्हा सावध

मुंबई | धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळानूसार आपल्या सवयी देखील बदलत आहेत. परिमाणी आरोग्याच्या अनेक समस्या जाणवायला लागल्या आहेत. रात्री झोपत असताना खोलीत रंगीत लाईट लावत असाल तर सावध व्हा.

बाजारात सजावट आणि खोली आकर्षक होण्यासाठी अनेक पद्धतीच्या लाईट्स उपलब्ध आहेत. कृत्रीम लाईट्सच्या आजूबाजूस झोपणे ही गोष्ट आरोग्यासाठी अधिक घातक ठरत आहे. कृत्रीम लाईट्समुळे ग्लुकोज लेव्हल वाढत असल्याचं समोर आलं आहे.

कृत्रीम लाईट्समुळे मेटाबाॅलिज्म खराब होत जाते परिणामी ह्रद्यरोग, डायबिटीज, मेटाबाॅलिज्म सिंड्रोम यांसारख्या समस्या जाणवायला लागतात. नाॅर्थवेस्टर्न विद्यापीठ शिकागोमध्ये याविषयी संशोधन करण्यात आलं आहे. अनेक स्तरामध्ये संशोधन केल्यानंतर संशोधक निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत.

दरम्यान, कृत्रिम लाईट्सचा उपयोग सध्या शहरी भागात अधिक प्रमाणात वाढल्याचं समोर आलं आहे. नर्व्हस सिस्टीममध्ये बदल होत असल्याचंही समोर आलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“आमदारांना घरे देण्याचा निर्णय झाला नाही”; ठाकरे सरकारचा यु-टर्न

“आंडू पांडूंनी माझा नाद करू नये”; भाजपचा ठाकरे सरकारला इशारा

“राजीनामा मागणारे विरोधक आणि…”; पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेर

पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी! 10वी नापास देखील करू शकतात अर्ज

डॉ. प्रमोद सावंत यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More