Top News महाराष्ट्र मुंबई

कलर्सने मुख्यमंत्र्यांना आणि राज ठाकरेंना पाठवलेल्या माफीनाम्यात ‘हा’ आहे फरक; खोपकरांची ट्विटद्वारे माहिती

मुंबई | कलर्स वाहिनीवरील बिग बॉसमधील जान कुमार सानूने मराठी भाषेबद्दल केलेल्या अपमानकारक वक्तव्यामुळे कलर्स वाहिनीला माफीनामा लिहावा लागला आहे. जान कुमार सानूनेदेखील माफी मागितली आहे. मनसे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. बिग बॉस बंद करण्याची मागणी केली होती. मात्र कलर्सने माफीनामा लिहिला आहे.

कलर्सने मनसेला आणि मुख्यमंंत्र्यांना माफीनामा पाठवला खरा पण या दोन्ही माफीनाम्यांमध्ये फरक होता. तो फरक म्हणजे मनसेला मराठी भाषेतून माफीनामा पाठवला होता तर मुख्यमंत्र्यांना इंग्रजीमध्ये माफीनामा लिहिला होता. मनसेने यावरून शिवसेनेवर निशणा साधला आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत पत्र आणि राजसाहेबांना मराठीत मनसे माफीनामा. कलर्सवाल्यांना पण माहिती आहे खरं सरकार कुठे आहे, असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे.

दरम्यान, जान कुमार सानू मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नाॅमिनेट करतोय याला. असं म्हणत खोपकरांनी धमकीवजा इशारा दिला होता.

 

 

महत्वाच्या बातम्या-

‘मतदान बोटाने नाही तर…’; सोनू सूदचा बिहारच्या लोकांना मोलाचा सल्ला

‘…म्हणून पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केली’; पाकिस्तानी मंत्र्याच्या खुलासा

खळबळजनक! मनसे नेत्याची तलवारीने वार करून हत्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपालांना भेटणार!

“शुगर वाढली की राणे काय बोलतात, ते त्यांनाच कळत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या