मुंबई | कार्यालयात काम सोडून केस विंचरत बसणं हे गंभीर गैरवर्तन आहे, असं मत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केलं आहे.
रंगराव चौधरी नावाच्या व्यक्तीने कामगार न्यायालयाच्या मे 1995 मधील आदेशाला आव्हान दिलं होतं. त्याची याचिका न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली आहे.
कंपनीने रंगरावविरोधात बॉसवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच त्याची खात्यांतर्गत चौकशी करून नंतर त्याला कामावरून काढून टाकले होतं.
कामगार न्यायालयाने रंगरावची फौजदारी खटल्यातून निर्दोष सुटका केली होती. मात्र कार्यालयातील गैरवर्तनाचा ठपका त्याच्यावर कायम राहिला. त्यामुळे तो पुन्हा कार्यालयात रुजू होऊ शकला नाही. याकडे रंगरावने उच्च न्यायालयाचे लक्ष वेधले होते. मात्र न्यायालयाने त्याचं म्हणणं ऐकून घेण्यास स्पष्ट नकार दिला.
थोडक्यात बातम्या-
…म्हणून माझ्यासोबत हे सारं घडतंय; स्वत:च्या गावात धनंजय मुंडे भावुक
“मातृभाषेत शिक्षण देणारं वैद्यकीय, तांत्रिक महाविद्यालय प्रत्येक राज्यात असावं”
उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, जोशीमठ धरण फुटल्याने अनेकजण वाहुन गेल्याची भिती
राज्यातील भाजप नेत्यांना ‘जनाची नाही, तरी मनाची ठेवावी’- रोहित पवार
छातीत दुखत असल्यामुळे तो डॅाक्टरांकडे गेला; रिपोर्ट पाहून डॅाक्टरांनाही बसला धक्का
Comments are closed.