‘चंद्रकांत दादा परत या, आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही’, कोथरूडमध्ये पुणेकरांची खास टोमणेबाजी
पुणे | कोल्हापूरमध्ये भाजपचा एकही आमदार नाही, अशी खंत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवली होती. एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी चंद्रकांत पाटील कोल्हापूरात ठाण मांडून बसले आहेत. त्यातच आता पुणेकरांनी खास अंदाजात चंद्रकांत पाटलांना टोमणा मारला आहे.
चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. येथील नागरिकांनी दादा महिनाभरापासून गायब आहेत, अशा आशयाचे पोस्टर्स लावले आहेत. एखादा व्यक्ती हरवल्यास ज्याप्रकारे मजकूर लिहीला जातो अगदी त्याचप्रकारे लिहिलं आहे.
दादा एक महिना झाला तुमचा शोध कुठेच लागत नाही. आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या. आम्ही तुमची वाट पाहतोय, समस्त कोथरूडकर, अशा आशयाचं बॅनर लावलेलं आहे. चंद्रकांत पाटील हे महिनाभरापासून कोल्हापूर येथे व्यस्त आहेत. त्यातच पुणेकरांनी थेट बॅनरचं लावले आहेत.
दरम्यान, उत्तर कोल्हापूर मतदार संघात भाजपने सत्यजित कदम यांना उमेदवारी दिलेली आहे. तर काँग्रेस पक्षाकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
थोडक्यात बातम्या-
पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरेंचं पहिलं ट्विट, म्हणाले…
किरीट सोमय्यांची नवी खेळी, अडचणी वाढताच…
‘रशियाशी मैत्री वाढवली तर…’; अमेरिकेचा भारताला थेट इशारा
वसंत मोरेंना मनसेचा झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
‘या’ गोष्टींमुळे मुली जाऊ लागतात मुलांपासून दूर, वेळीच व्हा सावध
Comments are closed.