Top News परभणी महाराष्ट्र

‘उद्या सकाळी शेतात या’, असं व्हॉट्सअ्ॅप स्टेटस ठेवत शेतकऱ्यानी केली आत्महत्या

परभणी | परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील तिवठाणा गावामधील एका शेतकऱ्यानी कर्जवसुलीला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

चंद्रकांत भगवान धोंडगे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. धोंडगेंनी आत्महत्येपुर्वी मला पैशासाठी धमक्या येत असून, त्यामुळं मला त्रास झाला आहे. माझ्यानंतर माझ्या मुलांचा सांभाळ करावा उद्या सकाळी मी शेतात आहे सर्वांनी यावे, असं व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवलं होतं.

धोडगेंचं स्टेटस पाहता त्यांचे काका हणमंत धोंडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीनं चंद्रकांत धोंडगे यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी चंद्रकांत धोंडगेंना मृत घोषित केलं. तसंच आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

थोडक्यात बातम्या-

‘अभिनेत्री वॅाशरुमध्ये असताना…’; पंचतारांकित हॅाटेलमध्ये अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार

‘शरजील नावाच्या कारट्याला अटक होणार नसेल तर…’; नितेश राणे आक्रमक

“हरामी सर्जील उस्मानीला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे”

‘आजचा हिंदू समाज सगळा सडलेला आहे’; शरजील उस्मानीचं वादग्रस्त वक्तव्य

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ‘या’ मराठी दिग्दर्शकाला एनसीबीनं घेतलं ताब्यात

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या