Top News

कॉमेडियन भारती सिंहच्या घरी NCBची धाड; भारती सिंह आणि पती हर्ष ताब्यात

मुंबई | एनसीबीच्या पथकानं प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी धाड टाकली आहे. यावेळी करण्यात आलेल्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांना भारतीच्या घरातून गांजा मिळाल्याची माहिती आहे.

एनसीबीच्या मुंबईतील झोनल पथकाने ही कारवाई केली आहे. ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर एनसीबीने ही कारवाई केल्याचं कळतंय.

भारतीच्या घऱी सापडलेल्या वस्तू घेऊन एनसीबी अधिकारी अंधेरीहून बेलार्ड पियर स्थित एनसीबी कार्यलयात जाण्यासाठी रवाना झाले आहेत.  भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया याला एनसीबीने ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधलं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे. यानंतर एनसीबीने धडक कारवाई सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“…त्यामुळे मुंबई महापालिका शिवसेनेसाठी सोडली होती”

“लस देताना सामान्य आणि व्हिआयपी असा भेदभाव नको, सर्वांचाच जीव सारखाच”

टीम इंडियात स्थान मिळालं नाही हे कळलं तेव्हा…; अखेर सुर्यकुमार यादवने सोडलं मौन

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण

धक्कादायक! मुंबईत 2 अल्पवयीन मुलांनी केला तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या