Top News मनोरंजन

18 तासांच्या चौकशीनंतर भारतीचा पती हर्ष लिंबाचियाला देखील अटक

मुंबई | कॉमेडियन भारती हिच्या घरी काल अंमली पदार्थ विरोधी विभागाने छापा टाकला. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने भारतीला अटक केली. तर आता भारतीपाठोपाठ तिचा पती हर्ष लिंबाचियालाही एनसीबीकडून अटक करण्यात आलीये.

तब्बल 18 तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने हर्षला अटक केली. यापूर्वी भारती सिंह आणि तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीयाला एनसीबीने समन्स बजावले होते.

भारती सिंहच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळीच ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर संध्याकाळी चौकशीनंतर प्रथम भारतीला अटक करण्यात आली.

एनसीबीने भारतीला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत अटक केलीये. तर त्यानंतर हर्षला देखील अटक करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-

पत्री पुलाचं गर्डर लाँचिंग म्हणजे चंद्रयान नव्हे; मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका

शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक; निलेश राणेंचा टोला

‘ही’ गोष्टी शिवसेनेच्या मूर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार?; काँग्रेस नेत्याची टीका

आयसीसीचा मोठा निर्णय! ‘या’ वर्षाखालील खेळाडू खेळू शकणार नाहीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट

शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार- शिक्षणमंत्री

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या