बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काॅमेडी किंग जाॅनी लिव्हर लावणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर हजेरी

मुंबई | प्रेक्षकांना खळखळून हसवणारे कॉमेडीकिंग जॉनी लिव्हर यांनी आपल्या विनोदी शैलीनं अनेकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दिग्गज कॉमेडीकिंग जॉनी लिव्हर नुकतेच सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये आले होते. अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर या शोचा एक छोटासा टीजर शेअर केला आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा सगळ्यांचा लाडका कार्यक्रम 18 जुलैपासून ‘रविवारची हास्यजत्रा’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवायला खुद्द दिग्गज कॉमेडीकिंग जॉनी लिव्हर येणार असून जॉनी लिव्हरच्या उपस्थिती नक्कीच रसिकांसाठी मनोरंजनाची ट्रीटच ठरणार आहे.

कलर्स मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे. या शो मधील सर्वच कलाकार आपल्या विनोदी अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. कॉमेडीकिंग जॉनी लिव्हर शोमध्ये आले त्यामुळे या शोचे आणखी जास्त मनोरंजन होणार हे नक्की.

दरम्यान, विशेष म्हणजे रविवारी 2 तास हास्यजत्रा पाहायला मिळणार आहे. आजकाल नेटफ्लिक्स आणि ऍमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्टँडअप कॉमेडी शो बरेच प्रसिद्ध झाले आहेत. जॉनी लिव्हर हे भारतातील पहिले स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळखले जातात.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

थोडक्यात बातम्या – 

“ठाकरे सरकार हँग झालंय त्यामुळे निकालाची वेबसाईट ‘हँग’ली तर नवल काय?”

“मोदींनी कौतुक केलं म्हणून योगी सरकारचं अपयश लपत नाही”

“आम्ही वाट पाहतोय सभ्य शेजारी बनून राहण्याची पण आरएसएची विचारसरणी मध्ये आली”

मोदी सरकारनं दिली आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर; खरेदी करणार ‘इतके’ कोटी डोस

‘हो, पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहेत’; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More