बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा; दिवाळीत सोनं मिळणार स्वस्तात!

मुंबई | कोरोनाकाळात सोनं-चांदीच्या किंमतीने सर्वोच्च उच्चांक गाठत आतापर्यंतचे किंमतीचे सर्व विक्रम मोडीत काढले. त्यातच मागच्या दिवाळीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सोनं स्वस्त होईल, असा अंदाज सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर दिवाळीत उत्तम संधी असल्याचंही बोललं जात आहे.

मागच्या वर्षी दिवाळीत सोन्याचा दर हा 51 हजार रुपये प्रति तोळा एवढा होता. आता तोच दर खाली उतरून 47 हजार रुपये प्रति तोळा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सोन्याला उत्तम गुंतवणूकीचा पर्याय म्हणून पाहिलं जातं. त्यातच दसऱ्यानंतर सोन्याच्या किंमती वाढत असताना पाहायला मिळाल्या.

सोन्याच्या या वाढत्या किंमती कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोनं गुंतवणूकीचा उत्तम पर्याय जरी असेल तरी आता सांभाळणं ही एक मोठी जोखमीची जबाबदारी आहे. त्याला पर्याय म्हणून आता गुगल-पे, अमेझाॅन आणि पेटीएम अशा कंपन्यांनी पुढाकार घेत ऑनलाईन सोनं खरेदी आणि साठवणूकीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्यासाठी प्रति तोळा 49 हजार 300 रुपये मोजावे लागत आहेत. दिवाळीत आता या किंमती कमी होणार का? आणि सर्वसामान्यांना सोनं खरेदीसाठी दिलासा मिळणार का?, य़ाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

थोडक्यात बातम्या

…अन् सगळेच भारतीय खेळाडू बसले गुडघ्यावर! कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

अनन्या पांडे हाजिर हो!, ड्रग्ज प्रकरणात अनन्या पांडेच्या अडचणी संपता संपेना

आधी डेटिंगची अफवा, नंतर ऋषभ पंतकडून व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक, आता पंतसाठी उर्वशी थेट दुबईत स्टेडियमवर

झोमॅटो आणि पाकिस्तानी फुड डिलिव्हरी ॲपमध्ये ‘या’ कारणावरून रंगलंय शीतयुद्ध

संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओवर प्रविण दरेकरांची प्रतिक्रीया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More