बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! खाजगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात, ठाकरे सरकारचा महत्वपुर्ण निर्णय

मुंबई | महाराष्ट्र राज्य सरकारने खाजगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्क्याची कपात करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाचा जीआर काढण्यात आलेला नव्हता, तो जीआर आता 2021-22 साठी काढला आहे. त्यामुळे पालकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. तसेच ज्या पालकांनी शाळेची पुर्ण फी भरली होती त्यातुन 15 टक्के फी शाळांमधून कपात केली जाणार आहे.

महाराष्ट्र सरकारने राजस्थान सरकारप्रमाणे 15 टक्के शु्ल्क फीमध्ये कपात करावी असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते. त्यासोबतच कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबतचा राज्य सरकारला निर्देशही सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.

कोर्टाच्या निर्णयानंतर खाजगी शाळांच्या फी मध्ये 15 टक्के कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीत निर्णय झाल्याची माहिती शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

दरम्यान, पालक आर्थिक संकटात असल्याने फी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या निर्णायाला महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टी असोसीएशनने विरोध केला आहे. खाजगी शाळांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला नाही आहे. फक्त मतांच्या राजकारणासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे, असा आरोप महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टी असोसीएशनचे अध्यक्ष डॉ.नामदेव दळवी यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचा मुद्दा मोठा झाला- राज ठाकरे

“संसदेमध्ये महिला सदस्यांना धक्काबुक्की ही तर ‘गुजरात मॉडेल’ ची प्रतिकृती”

रक्षाबंधनाच्या अगोदर नरेंद्र मोदींनी महिलांना दिलं हे खास गिफ्ट; केली मोठी घोषणा!

“राज्य सरकारच्या सर्कशीतल्या कोलांट उड्यांना जनता त्रासली आहे”

“इंग्रजांनी भारताची लूट केली, त्यांच्यावरचा राग अजूनही डोळ्यात माझ्या सलत आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More