बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! पुण्यात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी घट

पुणे | गेले काही महिने कोरोना महामारीने पुणेकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र, अलिकडे पुण्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे.

पुण्यात आज दिवसभरात 236 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 243 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 5 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

पुण्यात सध्या 223 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्याची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,86,905 एवढी आहे. तर पुण्यात सध्या 2577 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत पुण्यात एकूण 8761 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 4,75,567 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. प्रशासनाच्या कठोर पावलांमुळेच पुण्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या –

‘अहो, हे खरं असुच शकत नाही’; मीराबाई चानुच्या ‘त्या’ फोटोवर आर.माधवन म्हणतो…

अनिल देशमुख नॉट रिचेबल; ईडीकडून देशमुख कुटुंबाला समन्स, हजर न राहिल्यास…

मुंबईकरांनी करून दाखवलं; कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

स्तनपान करतानाचा फोटो शेअर करत ‘ही’ बडी अभिनेत्री म्हणाली…

बाबो! हाॅकी संघाने सुवर्णपदक जिंकल्यास ‘हे’ सरकार प्रत्येक खेळाडुला देणार एवढे कोटी रूपये

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More