बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! Omicronवर प्रभावी ‘या’ गोळीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी

नवी दिल्ली | कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्राॅननं सध्या डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. दिवसागणिक ओमिक्राॅनची (Omicron) रुग्णसंख्या वाढत चालल्याचं चित्र दिसून येत आहे. अशातच आता ओमिक्राॅनवर प्रभावी असणाऱ्या गोळीला मान्यता मिळाली आहे.

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमिक्राॅननं (Omicron) तर चिंतेत आणखी भर पाडली आहे. रोज कुठेना कुठे ओमिक्राॅनचा रुग्ण आढळत आहे. त्यामुळे ओमिक्राॅनची बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यांमध्ये फायझर कोरोना गोळीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

ओमिक्राॅनशी दोन हात करण्यासाठी फायझरच्या कोरेना गोळीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. फायझरची कोरोना गोळी ओमिक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी आहे. या गोळीचा वापर करुन रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण आणि कोरोनाबळींची संख्या कमी करण्यास 90 टक्के परिणामकारक ठरेल, असा दावा अमेरिकन औषध कंपनी फायझरनं केला आहे.

दरम्यान, ओमिक्राॅन (Omicron) या नव्या व्हेरिएंटनं सगळीकडे एकच खळबळ माजवली आहे. कारण दिवसागणिक संसर्गाचा धोका वाढत चालला आहे. ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग पाहता चिंताजनक वातावरण झालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! ‘या’ देशानं 11 दिवसांसाठी घातली हसण्यावर बंदी

‘बलात्काराचा आनंद घ्या’; म्हणणाऱ्या काॅंग्रेस नेत्यानं मागितली जाहीर माफी

“निवडणुका आणि राजकारण हा तर खेळ, तो काळजीपूर्वक खेळला पाहिजे”

हात न लावता शेण उचलण्यासाठी शेतकऱ्याचा देसी जुगाड, पाहा व्हिडीओ

सचिन तेंडुकरची BCCI एन्ट्री?; सौरव गांगुली म्हणतो…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More