बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! जगाला टेन्शन देणाऱ्या ओमिक्रॉनवर येणार प्रभावी लस

मुंबई |  ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) या नव्या कोरोना व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. स्पाइक प्रोटीनमध्ये तीस पेक्षा जास्त म्युटेशन्स झाले. त्यातून निर्माण झालेला ओमिक्रॉन विषाणू डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक आहे. ओमिक्रॉन विषाणूची धास्ती घेत जगातील सर्वच देश सतर्क झाले आहेत. आता ओमिक्रॉनवर बायोएनटेक प्रभावी लस शोधण्याचं काम सुरू केलं आहे. (New Corona varient Omicron)

ओमिक्रॉन या नव्या कोरोना व्हेरिएंटचा धोका वाढल्यास बायोएनटेक ( BioNTech) ही कंपनी पुढील शंभर दिवसात प्रभावी लस बाजारात आणण्याची तयारी करत आहे. बायोएनटेक ही अमेरिकेतील आघाडीची लस निर्माण करणारी कंपनी फायझर (Pfizer) सोबत कोरोना लस विकसित करणारी कंपनी आहे. ओमिक्रॉन इतर व्हेरिएंटपेक्षा जास्त वेगाने होणारा संसंर्ग पाहता कंपनीकडून त्यावर काम सुरू केल्याचंं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

ओमिक्रॉन हा व्हेरिएंटबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील चिंता व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिका आणि इतर देशात करण्यात आलेल्या संशोधनानुसार ओमिक्रॉन डेल्टा व्हेरिएंटपेक्षा 6 पट अधिक बलशाली म्हणजेच संसर्गजन्य आहे. तसेच वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार ओमिक्रॉन विषाणू बिटा आणि डेल्टापेक्षा अनुवंशिक रूपाने वेगळा आहे.

दरम्यान, ओमिक्रॉन जगात पसरण्याचा धोका असल्याने उपलब्ध लसीमध्ये आवश्यक ते बदल करत असल्याचं बायोएनटेक कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. बायोएनटेकची सद्यस्थितीत  उपलब्ध असलेली कोरोना लस ओमिक्रॉन विषाणूवर किती प्रभावी ठरते, हे तपासण्यात येणार आहे. या निरीक्षणाचे रिझर्ट दोन आठवड्यात येतील. त्यानंतर आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत.

थोडक्यात बातम्या- 

खळबळजनक! सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्यात तासभर चर्चा, काँग्रेस आक्रमक

अभिजीत बिचुकले म्हणतात, “मी कुणाच्या बापाला घाबरत नाही”

अमृता फडणवीस राजकारणात येणार का?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मुंबईचं टेन्शन वाढलं! आदित्य ठाकरेंनी दिली ‘ही’ धक्कादायक माहिती

शिवसेना-भाजप पुन्हा मैत्री होणार का?, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More