दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत घट, परंतू मृतांच्या संख्येत वाढ
मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असतानाच आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं आहे.
दिवसभर लाॅकडाऊन असल्यामुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत परिणामी रुग्णसंख्येत घट झाल्याचं दिलासादायक चित्र समोर येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 24,136 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच काल तब्बल 36 हजार 176 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आलं आहे. काल 601 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असताना काल हे दिलासादायक चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर, मुंबईतुनही काही प्रमाणात दिलासादायक चित्र समोर आलं आहे. रुग्णवाढीच्या संख्येपेक्षा तिकडे बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्रात सध्या 3 लाख14 हजार 368 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
कोरोना रूग्णसंख्या हळूहळू कमी होत असल्यानं, येत्या 30 मे पर्यंत सर्व रूग्णसंख्या सामान्य असेल तर जिल्ह्यांतर्गत लाॅकडाऊन उघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या काळात मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची आणि टास्क फोर्ससोबत बैठका घेऊन अंतिम निर्णय घेणार आहेत. परंतू, त्याआधी महाराष्ट्र सरकार लाॅकडाऊन उघडण्यासाठी योजना आखत आहे, अशी माहिती समोर येत आहे.
संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून येत आहे. मात्र, काल दिवसभरात पुण्यातुन काही प्रमाणात दिलासादायक चित्र पाहायला मिळालं, दिवसभरात 739 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता लाॅकडाऊनचा असा सकारात्मक परिणाम होत असताना पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या-
कोरोनाला रोखण्यासाठी ‘या’ आमदाराने शहरातील गल्ल्यांमध्ये फिरवला होमयज्ञ!
कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केलं?- नारायण राणे
‘अरे ही तर पॅन्ट घालायला विसरली..!’ बोल्ड कपड्यांवर कुत्रा फिरवणारी ‘ही’ अभिनेत्री झाली ट्रोल
कारागृहात जाताच ढसाढसा रडला पैलवान सुशीलकुमार, अशी गेली पहिली रात्र!
“मुलं जन्माला घालण्यासाठी मी काही यंत्र नाही, मुलं जन्माला नाही घातली तर काय फरक पडतो”
…नाहीतर ही शेवटची चड्डीही काढेन; नाशिकमधील आंदोलनाची देशभरात चर्चा
Comments are closed.