बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंता वाढली! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ

मुंबई | गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण आला आणि परिणामी अनेकांना उपचाराअभावी आपला प्राण गमवावा लागला. परंतु, अलिकडे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र आहे. मात्र, कालच्या तुलनेत महाराष्ट्रात आज रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे.

आज महाराष्ट्रात 9 हजार 812 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच 8 हजार 752 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 179 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 60 लाख 28 हजार 847 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 57 लाख 81 हजार 551 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात 1 लाख 21 हजार 251 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात वाढणारी रुग्णसंख्या ही कमी झाल्याने महाराष्ट्रात दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला देखील सुरुवात झाली आहे. अशीच रुग्णसंख्या कमी होत राहिली तर महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल.

थोडक्यात बातम्या – 

राष्ट्रपतींचा दौरा दोघांच्या जिवावर बेतला! 3 वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेने प्राण गमावले

ह्रदयद्रावक! दीड फुटांची सळई छातीतून आरपार गेलेल्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

“मंत्रिपदासाठी लाचार झालेला नेता आम्हाला नको”; रामदास आठवलेंना घरचा आहेर

हरियाणा आणि पंजाबमधील वातावरण तापलं, बॅरिकेड तोडत शेतकऱ्यांची राजभवनाकडे कूच

कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरीएंटची लक्षणं नेमकी कोणती? काय काळजी घ्यावी?, वाचा सविस्तर

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More