बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! तब्बल 18 महिन्यानंतर मुंबईत एकही कोरोना मृत्यू नाही; पाहा आजची आकडेवारी

मुंबई | गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यातच आता मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं दिसत आहे. अशातच आता मुंबईने गेल्या 18 महिन्याचा रेकाॅर्ड मोडला आहे.

मुंबईत आज दिवसभरात 367 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 418 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे दीड वर्षात पहिल्यांदाच मुंबईत कोरोना मृत्यू झाला नाही.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,50,0808 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 5030 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 16,180 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,27,084 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. मात्र आता संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यायली हवी, असं महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

केरळमध्ये पावसाचा हाहाकार! भूस्खलनात शेकडो नागरिक दबल्याची भीती तर 26 जणांचा मृत्यू

T-20 वर्ल्ड कपला धमाकेदार सुरूवात; ‘या’ देशाने पहिला सामना 10 गडी राखून जिंकला

“भाजपने बेईमानी केली नसती तर उद्धवसाहेब देखील बेईमान झाले नसते”

‘आठवण करून देतोय, बाप बाप असतो!’; रामदास कदमांच्या बॅनरबाजीने सर्वांच्या भुवया उंचावल्या

“निर्णय तर मोदींचा होता पण, त्यामागे डोकं कोणाचं होतं?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More