Top News देश

दिलासादायक! भारत बायोटेकची लस तिसऱ्या टप्प्यात, लवकच चाचणीला होणार सुरुवात

नवी दिल्ली | कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीकडून ‘कोव्हॉक्सीन’ नावाची लस विकसित केली जात आहे. ही लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहचली असल्याची माहिती समोर आली आहे.

2 ऑक्टोबरला भारत बायोटेकने लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी ड्रग्स कंन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे परवानगी मागीतली होती. DCGIने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी दिली असून, लवकरच तिसऱ्या चाचणीला सुरुवात केली जाणार आहे.

तिसऱ्या टप्प्यातील चाचणी 18 तसेच त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या एकूण 28,500 स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार आहे. ‘कोव्हॉक्सीन’ लसीची चाचणी ही देशात एकूण सहा ठिकाणी केली जाणार आहे.

दरम्यान, भारत बायोटेकने मागील महिन्यात एका अहवालात ‘कोव्हॉक्सीन’ ही लस अत्यंत प्रभावी असून कोरोना व्हायरस विरोधात लढण्यास सक्षम असल्याचा दावा केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीत एकनाथ खडसेंना कोणतं पद देणार? जयंत पाटील म्हणाले…

Drugs Controller General of India 

 

…तर त्या देशाला मोठी किंमत मोजावी लागेल- जो बायडेन

आज एकनाथ खडसेंचा जाहीररित्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार!

मुंबई- सिटी सेंटर मॉलमध्ये अग्नितांडव, 11 तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

विनयभंगाच्या तक्रारीतून खडसे अजून सुटलेले नाहीत- अंजली दमानिया

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या