दिलासादायक! तब्बल 8 महिन्यानंतर पुण्यात एकही कोरोना मृत्यू नाही; पाहा आजची आकडेवारी
पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घट होत आहे. तर डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.
पुण्यात आज दिवसभरात 112 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 118 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. 6 फेब्रुवारी 2021 नंतर पहिल्यादांच आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 5,03,469 इतकी आहे. तर पुण्यात 988 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 9,067 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज 5,986 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.
थोडक्यात बातम्या-
तुमचा लॅपटॉप हॅंग होतोय का? मग वाचा ‘या’ भन्नाट टिप्स
सचिन सावंत यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात खळबळ
अखेर रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड!
‘…तर केंद्र सरकार विकावं लागेल’; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं इंधन दरवाढीचं कारण
“सत्तेत असला तरी चुकीचं वागू नका, सर्वांना नियम सारखेच आहेत”
Comments are closed.