बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर, नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासात एकूण 374 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज एकूण 482 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आजची आकडेवारी काहिशी दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 5 हजार 779 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 97 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने मुंबईची कोरोनामुक्तीकडे आगेकूच होत असल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.

रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत होती. मात्र, मुंबईतील रुग्णसंख्या मागच्या काही दिवसात हळूहळू कमी झाली आहे.

थोडक्यात बातम्या – 

पुणेकरांनो सावधान… आणखी इतके दिवस राहणार पावसाचा मुक्काम!

महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचंही लक्ष, देवेंद्र फडणवीस यांचा दिल्लीशी संपर्क

कौतुकास्पद! 20 फूट पाण्यात उडी घेत तरूणाने देशी जुगाड करत 5 महिलांना आणलं मृत्युच्या दाढेतून माघारी

महाराष्ट्राला पावसाने झोडपलं, सुप्रिया सुळेंची केंद्राकडे मदतीची मागणी

“अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More