बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! Omicron वर औषध सापडलं, शास्त्रज्ञांचा दावा

नवी दिल्ली | कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्राॅननं (Omicron) आता हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. ओमिक्राॅन व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही या नव्या व्हेरिएंटची लागण होत आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेत आणखी भर पडली आहे.

ओमिक्राॅनचा संसर्ग वाढत चालला असून त्याविषयी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच ओमिक्राॅनविषयी एक बातमी समोर आली आहे. ओमिक्रॉन (Omicron) विषाणूवर प्रभावी औषध सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

एका ब्रिटीश शास्त्रज्ञानं ओमिक्राॅवर औषध सापडल्याचा दावा केला आहे. ओमिक्राॅनवर सोट्रोविमॅब (Sotrovimab) हे औषध अत्यंत प्रभावी असल्याचं या शास्त्रज्ञानं म्हटलं आहे. ग्लॅक्सो स्मिथक्लाइन (GlaxoSmithKline-GSK) आणि तिची अमेरिकेतली भागीदार कंपनी व्हीआयआर (VIR) बायोटेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने हे विशेष औषध विकसित करण्यात आलं आहे. सोट्रोविमॅब ही अँटीबॉडी-आधारित थेरपी आहे.

दरम्यान, सोट्रोविमॅब औषधाने ओमिक्रॉनच्या 37 उत्परिवर्तनांविरुद्ध प्रभावीपणे काम केलं असल्याचा दावा कंपनीने केला आहे. आता हे औषध खरंच उपयोगी आहे की नाही हे पाहणं मह्त्त्वाचं ठरेल.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, ‘इतक्या’ हजार कोटी जणांना मिळणार नोकऱ्या!

Royal Enfield च्या नव्या बाईकचा जलवा; 2 मिनिटांत विकल्या गेल्या सर्व बाईक

‘…आम्ही थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू’; शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

चिंताजनक! Omicron झालेल्या मुलांमध्ये दिसून येतायेत ‘ही’ गंभीर लक्षणे

“ख्रिसमसदिवशी असं काही घडणार की संपूर्ण जग हादरणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More