बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! येत्या चार ते पाच दिवसात होणार पावसाचं दमदार आगमन, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | राज्यात काही दिवसांपासुन पावसाने दडी मारल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होता. अशातच महापुराच्या संकटानंतर ही पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. मात्र राज्यात आता मान्सुन सक्रिय झाला असुन तो येत्या चार ते पाच दिवसात जोरदार आगमन करेल अशी शक्यता भारताच्या मुंबई येथील प्रादेशिक विभागातील हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुढील काही दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, जर मुसळधार पाऊस पडला तर शेतकऱ्यांच्या दुबार पेरणीवरचं संकट आणखी वाढेलच. त्यासोबत पिक टिकवण्याचंही संकट असेल अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ के.एस होसाळीकर यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

गेल्या काही महिन्यात मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, आणि विदर्भात भीषण महापुर आल्याने अनेक ठिकाणी जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती. तर मराठवाड्यात ही जोरदार पाऊस झाला होता. मात्र कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या तुरळक पाऊस पडत आहे. राज्यात ब्रेकनंतर पुन्हा एकदा पाऊस कोसळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, 15 ऑगस्टनंतर खुप चांगला पाऊस पडणार आहे, असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. यावेळी कोकणात मुसळधार पाऊसाची शक्यता आहे तसेच विदर्भात आणि मराठवाड्यामध्येही चांगला होईल अस हवामान खात्याने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

राज कुंद्रासोबतचा ‘हा’ फोटो शेअर करत शर्लिन चोप्राने केला मोठा खुलासा; म्हणाली…

…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार!

मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय!

‘…त्या दिवशी पुन्हा कडक लॉकडाऊन करणार’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

राज्यातील हॉटेल चालकांसाठी मोठी बातमी! रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी, पाळावे लागणार ‘हे’ नियम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More