बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

मुंबई | आज रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं परिणामी रुग्ण संख्याही घटली होती. त्यानंतर महाराष्ट्रात नागरिकांना निर्बधांमधून सूट देण्यात आली आहे.

राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत आता वाढ होताना दिसत आहे. दिवसभरात राज्यात 02हजार 692 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 02 हजार 716 ग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत.

याशिवाय राज्यात दिवसभरात 41ग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात आजपर्यंत 65लाख 69जार 349 बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( रिकव्हरी रेट ) 97.27 टक्के एवढा झाला आहे.

दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या विषाणूने डोकं वर काढलं असताना पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोरोना नेमका कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

‘माझी पत्नी मला म्हणाली नाशिक किती…’; गडकरींनी सांगितला ‘तो’ खास किस्सा!

”किती शेतकऱ्यांचा बळी जाऊ देणार मोदीजी? मारेकऱ्यांना अटक करून सीबीआय चौकशी करा”

सोमवारपासून राज्यात शाळेची घंटा वाजणार! सरकारने केली’ ‘ही नवीन नियमावली जाहीर

ममता बॅनर्जींकडून पराभूत झालेल्या प्रियंका टिबेरवाल म्हणतात…’मीच या खेळाची मॅन ऑफ द मॅच…’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More