बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

मुंबई | आज रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं परिणामी रुग्ण संख्याही घटली होती. त्यानंतर महाराष्ट्रात नागरिकांना निर्बधांमधून सूट देण्यात आली आहे.

राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत आता वाढ होताना दिसत आहे. दिवसभरात राज्यात 03 हजार 131 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 04 हजार 21 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत.

याशिवाय राज्यात दिवसभरात 70 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात आजपर्यंत 63 लाख 44 हजार 744 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( रिकव्हरी रेट ) 97.02 टक्के एवढा झाला आहे.

दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या विषाणूने डोकं वर काढलं असताना पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोरोना नेमका कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

टीईटी परीक्षा पुढे ढकलली, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केली नवीन तारीख

येत्या 48 तासात ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार… वाचा हवामान खात्याचा अंदाज!

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना बसणार चाप, आता होणार थेट वाहन जप्तीची कारवाई!

“…तर कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या कानशिलात दोन हाणाव्यात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More