Top News कोरोना पुणे महाराष्ट्र

पुणे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण घटलं; विभागीय आयुक्तांचा दावा

पुणे | गणेशोत्सवानंतर शहरातील कोरोनाबाधितांचं प्रमाण 32 टक्क्यांवर पोहचलं होतं. मात्र आता हे प्रमाण घटून 24 टक्क्यांवर आलं असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

गणेशोत्सवात नागरिक एकमेकांच्या संपर्कात आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचं प्रमाण वाढलं होतं. पण येत्या आठवड्यात हे प्रमाण आणखी कमी होईल त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

17 सप्टेंबरपर्यंत बाधितांची संख्या दररोज एक हजार नऊशे इतकी होती. त्यानंतर 26 सप्टेंबरपर्यंत ती एक हजार सातशेवर आली. सध्या हे प्रमाण दीड हजाराच्या जवळपास आहे. पिंपरी-चिंचवड शहरात हे प्रमाण 15 टक्के एवढे आहे तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाधित रुग्णांची संख्या 13 टक्क्यांवर गेली असल्याचं विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार”

भारताने कोरोनामुळे झालेले मृत्यू लपवले- डोनाल्ड ट्रम्प

मास्‍क नसल्‍यास बेस्‍ट बसेसह टॅक्‍सी, रिक्षामध्‍ये नो एन्ट्री; पालिका आयुक्तांचे निर्देश

योगी आदित्यनाथांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा- प्रियांका गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या