बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक बातमी! एकदा कोरोना होऊन गेल्यावर दुसऱ्यांदा संक्रमणाचा धोका कमी

लंडन | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं दिसून येत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे लाॅकडाऊनचे नियम शिथिल होत असले तरी सर्वांनी खबरदारी बाळगावी अशा वारंवार सूचना सरकारकडून दिल्या जात आहेत. अशातच इंग्लंडच्या आरोग्य विभागाकडून दिलासादायक वृत्त समोर आलं आहे.

एकदा कोरोना संक्रमण झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा संक्रमण होण्याचा धोका कमी आहे, असं पब्लिक हेल्थ इंग्लंडने कोरोना व्हायरसच्या रिइंफेक्शनसंदर्भातील एक डेटा गुरुवारी जारी केला आहे. हा नवा डेटा दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग झालेल्या लोकांवर लक्ष ठेवणं आणि आजाराचं वर्तन समजून घेण्यासाठी सार्वजनिक करण्यात आला आहे.

नवीन अहवालानुसार दुसऱ्यांदा कोरोना संक्रमण झालेल्या लोकांची संख्या अत्यंत कमी असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे एकदा कोरोना होऊन गेलेल्यासांठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

दरम्यान, पब्लिक हेल्थ इंग्लंडमधील कोरोना स्ट्रॅटजिक डायरेक्टर डॉ. सुसान हॉपकिंस यांनी म्हटलं आहे, की आपल्याला एकापेक्षा अधिक वेळा कोरोना संक्रमण होऊ शकते का, यासंदर्भात लोक अत्यंत चिंतित आहेत. हे अम्हालाही माहित आहे की, लोक एकहून अधिक वेळा कोरोना संक्रमित होऊ शकतात. मात्र, भविष्यात दुसऱ्यांदा कोरोना संक्रमित होण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे, असं हा डेटा दर्शवतो.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! ‘या’ माजी मंत्र्याला अटक, महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप

सरनाईकांच्या लेटरबॉम्बवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणत घट, वाचा आजची आकडेवारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पहाटे देशाला संबोधित करणार!

चिंताजनक! देशातल्या ‘या’ राज्यात आढळला ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More