बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रच नंबर 1, लसीकरणाचा ‘इतका’ टप्पा केला पार

मुंबई | संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीमुळे अनेकांचे घर उध्वस्त झालेत. या महामारीचा फटका देशाबरोबरच महाराष्ट्र राज्याला देखील मोठ्या प्रमाणात बसला. कोरोनाचा सामना करण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहिम राबवण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राज्याने एक लसीकरणाचा मोठा टप्पा पार केला आहे.

भारतातील सर्व राज्यामधून सर्वात जास्त लसीकरण महाराष्ट्रात झालं आहे. रविवारी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात  9.14 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. यामध्ये लसीकरणात आतापर्यंत  6,32,70,144 लोकांना लसीकरणाचा पहिला डोस मिळाला आहे. तर  2,81,64,442 लोकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. त्यामुळे राज्यात एकूण 9,14,34,586 लोकांचं लसीकरण पुर्ण झालं आहे.

राज्यातील एकूण लसीकरणापैकी 18 ते 44 वयोगटातील 3,38,90,580 लोकांना पहिला डोस दिला आहे. तर  99,34,176 लोकांना दुसरा डोस घेऊन लसीकरण पूर्ण केलं आहे. त्याचबरोबर 45 पेक्षा अधिक वयोगटातील 2,59,40,566 लोकांना पहिला डोस आणि 1,53,10,357 लोकांनी  दुसरा डोस घेतलेला आहे.

दरम्यान, राज्यातून मुंबईमध्ये सर्वात जास्त 1,39,65,876 लोकांना डोस दिले गेले आहेत. तर पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याठिकाणी 1,15,01,073 लोकांनी डोस घेतलेले आहेत. लसीकरणाची मोहिम वेगाने राबवली जात असली तरी कोरोनाचा धोका अद्यापही अजून टळलेला नाही. तसेच येणाऱ्या काळात दिवाळीसारखे सण येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठेत होणाऱ्या जास्त गर्दीच्या ठिकाणी टाळले पाहिजे.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्याने रचला इतिहास, केलं 100 टक्के लसीकरण पुर्ण

“प्रेयसीनं दगा दिला म्हणजे प्रियकराला…”; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपुर्ण निकाल

साखर कारखान्याच्या निवडणुकीत एका मतासाठी 3 हजार मोजले, पार्ट्या केल्या अन्…; शिवसेना आमदाराची कबुली

“फडणवीसांनी याचे पुरावे सादर करायला हवे”

प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी राज ठाकरे अयोध्येला जाणार, कांचन गिरीजींनी घेतली भेट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More