बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेल तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त, वाचा ताजे दर

नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून खाद्य तेलाच्या(Edible Oil) दराने उच्चांक गाठला होता. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत होता. पण आता खाद्य तेलांचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा पुरवठा वाढल्याने दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे भारतात देखील खाद्यतेलाच्या दरात घसरण झाली आहे. 15 लिटर तेलाच्या डब्यामागे 300 ते 700 रूपये कमी झाले आहेत.

रशिया-युक्रेन यद्धामुळे भारतात अनेक वस्तू महागल्या होत्या. त्यातच आता खाद्यतेलांचे दर काही प्रमाणात कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. किरकोळ बाजारातही प्रतिलिटर 20 ते 40 रूपयांनी खाद्यतेल स्वस्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या दरांबद्दल आता केंद्र सरकारनेही काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता सर्वांचीच बचत होणार आहे.

पाम तेल, सुर्यफुल तेल, सोयाबीन आणि सरकी तेलांच्या किमतीतही मोठे बदल झाले आहेत. पाम तेल 170 रूपायांवरून 125 रूपायांवर आले आहे. सोयाबीन180 वरून 150, खोबरेल तेल 260 वरून 240 तर रिफाइंड तेल प्रतिलिटर 10 रूपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र वनस्पती तेलांच्या किमतीत वाढ झाली आहे. वनस्पती तेल 180 वरून 200 रूपयांवर पोहोचले आहे.

खाद्य तेल जरी स्वस्त झाले असले तरी देशात महागाई वाढत आहे. एलपीजी गॅसचे(LPG Cylinder) दर देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. एलपीजी गॅसने एक हजारांचा टप्पा पार केला आहे. पेट्रोल,डिझेल स्वस्त झाले असले तरी सीएनजी,पीएनजीचे दर वाढतच आहेत. तसेच काही खाद्यपदार्थांवर,इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जीसटी (GST) वाढल्याने नागरिकांच्या खिशाला दररोज कात्री बसत आहेत. त्यामुळे नागरिक महागाईने त्रासले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘त्या’ भाषणावरून निलेश राणेंची शरद पवारांवर टीका, फोटो शेअर करत केला भांडाफोड

सूड, हल्लाबोल, गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित

मोठी बातमी! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

तिच टीका करत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं, म्हणाले…

पावसाचा जोर पुन्हा वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More