बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं मोठं; 400 किमी अंतराहून येऊन मुस्लिम मित्राने दिली मुखाग्नी

लखनऊ | प्रयागराजच्या जयंतीपूर भागात हेम सिंह हे एकटे राहत होते. त्यांच्या मुलीचं आणि पत्नीचं निधन काही वर्षांआधीच झालं होतं. ते हायकोर्टात ज्वाइंट रजिस्ट्रार होते. एक आठवड्यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी आपला मित्र सिराज यांना फोन करून कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

हेम सिंह यांना प्रयागराजच्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलने दोन लाख रूपये जमा करण्यास सांगितले होतं. तेव्हा सिराज यांनी आपल्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर केले. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी हेम सिंह यांचं निधन झालं.

हेम सिंह यांच्या निधनाची माहिती मिळताच सिराज 400 किमीचा प्रवास करून रात्री उशीरा तिथे पोहोचले. दुसऱ्या दिवशी सिराज यांनी एक एक करून हेम सिंह यांच्या 20 नातेवाईकांना फोन केले. मात्र कुणीही त्यांना खांदा देण्यासाठी तयार झाले नाही. यानंतर सिराज यांनी हेम सिंह यांच्यावर अंत्यसंस्कार केले आहे.

कोरोना महामारीच्या या काळात जास्तीत जास्त लोक आपापला विचार करताना दिसत आहेत. माणूसकीला लाजवेल अशा घटना समोर येत आहेत. आपलेच लोक आपल्या लोकांपासून दूर पळताना दिसत आहेत. मात्र सिराज यांनी मित्राच्या मृत्यूनंतरही मैत्री निभावली आहे. या मित्राचं उदाहरण प्रत्येकजण देत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

आठ महिन्यांच्या गर्भवतीची हत्या, अत्यंत धक्कादायक घटनाक्रम आला समोर

#सकारात्मक_बातमी | सुरुवातीला बेड मिळेना, 2 दिवस वाहनातच, आज्जीची अखेर कोरोनावर मात

आईचा मृतदेह नेण्यासाठी मिळाली नाही ॲम्बुलन्स, स्मशानापर्यंतचा प्रवास सुन्न करणारा

18 वर्षावरील नागरिकांना कोरोना लसीसाठी वाट पाहावी लागणार, आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

पुण्यात कॅालेजला जाता येता झाली ओळख, मुलगी गर्भवती झाल्यावर बलात्कार झाल्याचं उघड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More